भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेच्या वेळापत्रकात बदल! नोंद करून ठेवा नवी तारीख
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून त्याआधी जे वेळापत्रक जाहीर झाले होते त्यामध्ये थोडा बदल झाला आहे. या वेळापत्रकानुसार चार सामने खेळले जाणार असून त्यामधील एकाची तारीख बदलण्यात आली आहे.
आयपीएल २०२६ च्या थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात हे सामने खेळले जाणार आहेत. या अफगाणिस्तानच्या या दौऱ्याची सुरूवात कसोटी सामन्याने होणार आहे. हा सामना ६-१० जून दरम्यान चंदीगडमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना ठरलेल्या तारखेप्रमाणे खेळला जाणार आहे. त्यानंतर वनडे मालिका सुरू होणार असून त्यातील एका सामन्याची तारीख बदलली आहे. यामधील पहिला वनडे सामना जो १४ जूनला खेळला जाणार होता, तो आता १३ जूनला खेळण्याचे नियोजित केले आहे. सामन्याचे ठिकाण तेच म्हणजे धरमशाला आहे. काही कारणांमुळे हा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने जेव्हा संघ जाहीर केला होता, तेव्हाच याबद्दल माहिती दिली होती.
या वनडे मालिकेतील दुसरा सामना १७ जूनला लखनऊमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना २० जूनला चेन्नईमध्ये खेळला जाणार असून या दोन्ही सामन्यांच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक २०२७ ची पूर्वतयारी म्हणून ही मालिका महत्त्वाची आहे. यामध्ये शुबमन गिल भारताचे नेतृत्व करणार असून श्रेयस अय्यरला उपकर्णधार म्हणून निवडले आहे.
या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामध्ये प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांचा समावेश आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –
शुभमन गिल (कर्ंधर), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्ंधर), केएल राहुल (डब्ल्यूके), इशान किशन (डब्ल्यूके), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर दुबे, हरिश दुबे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान वनडे मालिकेचे सुधारित वेळापत्रक-
पहिला सामना – १३ जून, धरमशाला
दुसरी चकमक – १७ जून, लखनौ
तिसरा सामना – २० जून, चेन्नई
Comments are closed.