आजपासून मेट्रोच्या 2 ए आणि 7 च्या वेळापत्रकात बदल

मेट्रो मार्गिका 7ला मेट्रो मार्गिका 9 सोबत जोडण्यासाठी आवश्यक प्रणाली एकत्रीकरण आणि सुरक्षा चाचण्या हाती घेण्यात येत आहेत. यासाठी 12 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत मेट्रो मार्गिका 2 ए व मेट्रो मार्गिका 7 या दोन्ही मार्गांवरील सकाळच्या मेट्रो सेवा नेहमीपेक्षा थोड्या उशिरा सुरू होतील.
डहाणूकरवाडीहून गुंदवलीला जाणारी पहिली मेट्रो सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7.01 वाजता सुटेल. तर शनिवार सकाळी 7 वाजता आणि रविवारी सकाळी 7.04 मिनिटांनी पहिली मेट्रो धावेल. अंधेरी पश्चिम येथून गुंदवलीकडे जाणारी पहिली गाडी सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 7.01 वाजता सुटेल. तर शनिवारी सकाळी 7.02 वाजता आणि रविवारी सकाळी 7.04 वाजता सुटेल. दहिसर पूर्व येथून अंधेरी पश्चिमकडे सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी 6.58 मिनिटांनी पहिली मेट्रो धावेल.
Comments are closed.