आजपासून रेल्वे, गॅसशी संबंधित बदल
मोबाईल अॅप्स आणि अन्य व्यवहारांमध्येही होणार मोठ्या सुधारणा, सर्वांना माहिती असणे आवश्यक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आजपासून, अर्थात 1 मार्च 2026 पासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात मोठे परिवर्तन घडणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती, रेल्वे तिकिटांचे व्यवहार, बँकांचे नियम आणि मोबाईल अॅप्ससंबंधीचे नियम यांच्यात व्यापक परिवर्तन होणार असल्याने प्रत्येकाला त्यांच्यासह तडजोड करावी लागणार आहे. या सर्व परिवर्तनांची माहिती यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्यांनीही त्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी ही माहिती करुन घेण्याची आवश्यकता आहे.
या सर्व परिवर्तनांचा परिणाम आपला खर्च, आपले डिजिटल व्यवहार, आपला प्रवास आणि इतर अनेक नेहमीच्या व्यवहारांवर होणार आहे. यांच्यातील अनेक परिवर्तने आपले व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांची माहिती प्रत्येकाला असणे हिताचे ठरेल, असे तज्ञांचे मत आहे.
गॅस सिंलिंडरसंबंधी माहिती
घरगुती गॅस सिलिंडरचे दर बऱ्याच काळापासून न वाढता स्थिर आहेत. तथापि, 19 किलो वजनाच्या व्यापारी गॅससिंलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी सिलिंडरच्या किमतीत नेहमीच थोड्याफार प्रमाणात चढउतार होत असतात. गेल्या महिन्यात दर 49 रुपयांनी वाढविण्यात आले होते. मार्चच्या प्रारंभापासूनही दरात काही प्रमाणात परिवर्तन होऊ शकते, अशी माहिती आहे.
रेलवन अॅपमुळे सुलभता
रेल्वे तिकिटे खरेदी करण्याची जुनी युटीएस पद्धती 1 मार्च 2026 पासून बंद होणार आहे. तिचे स्थान ‘रेलवन’ अॅपकडून घेतली जाणार आहे. या एकाच अॅपवरुन प्रवासी सामान्य तिकीट, फलाट तिकीट, रेल्वे आरक्षण, रेल्वे गाड्यांची येण्याजाण्याची स्थिती आणि लोकेशन यासंबंधीची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.
सिम बाईंडिंगमुळे सुरक्षा
1 मार्चपासून व्हॉटस् अॅप, टेलिग्राम किंवा सिग्नल यांच्यासारखी माध्यमे थेट आपल्या मोबाईलमधील सीमकार्डाशी जोडली जाणार आहेत. ग्राहकाने मोबाईलमधील सीमकार्ड काढले, तर ही अॅप्स चालू शकणार नाहीत. सीमकार्ड शिवाय केवळ वायफाय किंवा अन्य नेटवर्कस्चा उपयोग करता येणार नाही.
युपीआय आणि डिजिटल पेमेंट
1 मार्चपासून मोठ्या रकमांचे हस्तांतरण केवळ युपीआय पिनचा उपयोग करुन केले जाऊ शकणार नाही. असे हस्तांतरण करण्यासाठी बायोमेट्रिक किंवा अन्य मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता लागणार आहे. डिजिडल अरेस्टची भीती दाखवून लोकांना कोट्यावधी रुपयांना लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यांना रोखण्यासाठी ही व्यवस्था केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
CNG, PNG नियम
प्रत्येक महिन्यात पेट्रोलियम कंपन्या सीएनजी, पीएनजी, एएफटी आणि इतर इंधनांच्या किमतींमध्ये चढउतार करतात, 1 मार्च किंवा त्याच्या नंतरच्या काही दिवसांमध्ये नव्या महिन्यातही असे चढउतार दिसून येऊ शकतात. तथापि, या इंधनांचे दर मोठ्या प्रमाणात कमी-अधिक होण्याची शक्यता दुरापास्त आहे.
बँकिंग आणि किमान रक्कम नियम
1 मार्चपासून सरकारी बँकांमध्ये किमान रक्कम (मिनिमम बॅलन्स) नियमात परिवर्तन होणार आहे. यापूर्वी एक दिवस जरी बॅलन्स किमान प्रमाणापेक्षा कमी असला तरी, दंड केला जात होता. आता संपूर्ण एका महिन्याच्या सरासरी बॅलन्सच्या आधारावर दंड आकारला जाणार आहे. सामान्यांना लाभ होणार आहे. अशा प्रकारे 1 मार्च, अर्थात, आज रविवारपासून सर्वसामान्यांच्या व्यवहारांशी निगडीत अशी अनेक नियम परिवर्तने होणार असून ती लक्षात घ्यावी लागतील.
परिवर्तने लक्षात घेण्याची आवश्यकता
ड रविवारपासून विविध व्यवहारांच्या नियमांधील सुधारणा जाणणे आवश्यक
ड रेल्वे तिकीटे आणि आरक्षणासाठी अधिक सुविधाजनक असे एकच अॅप
ड बँक खात्यात बॅलन्स कमी असल्यास प्रत्येक दिनी दंड पद्धत बंद होणार
ड ऑनलाईल घोटाळे रोखण्यासाठी युपीआय पिन नियमात परिवर्तन होणार
Comments are closed.