केरळमध्ये दिवाळीच्या वेळी मंदिरात गोंधळ

मद्यधुंद तरुणांचा पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला

वृत्तसंस्था/ अलाप्पुझा (केरळ)

दिवाळी उत्सवादरम्यान केरळमधील अलाप्पुझा येथील एका मंदिरात वादाचा प्रसंग उद्भवला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथील मंदिरात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हिंसाचाराचा वापर केल्याबद्दल भारतीय दंड संहिता अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन पोलीस अधिकाऱ्यांनी काही कथित मद्यधुंद तरुणांना मंदिरात गोंधळ घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर बराच गोंधळ निर्माण झाला. मद्यधुंद तरुणांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे वादंग निर्माण झाल्याचे कुथियाथोड पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधिकारी घटनास्थळी मागवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.