जनावरांसारखे वागू नका, गायक कैलास खेर संतापले

कैलास खेर

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी मोठा गदारोळ घातला. ग्वाल्हेरमधील कार्यक्रमात गर्दी अचानक अनियंत्रित झाली. लोक बॅरिकेड्स तोडून थेट स्टेजच्या दिशेने धावले, ज्यामुळे परिस्थिती बिघडली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, कैलास खेर यांना शो मधेच थांबवावा लागला. ते संतापून म्हणाले, ‘तुम्ही जनावरांसारखे वागत आहात, कृपया असे करू नका.’ मात्र तरीही प्रेक्षकांनी ऐकले नाही. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम अर्ध्यातच बंद करावा लागला. ख्रिसमसचे औचित्य साधून ग्वाल्हेरमधील ‘मेला मैदान’ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Comments are closed.