मल्याळम अभिनेत्याविरूद्ध चार्जशीट दाखल
व्हॉट्सअॅप चॅट, ईमेलमध्ये मिळाले महत्त्वाचे पुरावे
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये एसआयटीने माकप आमदार आणि अभिनेता एम. मुकेश विरोधात बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. एर्नाकुलम न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यात मुकेश विरोधात डिजिटल पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुकेश आणि तक्रारदार यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि ईमेल पुराव्यादाखल सादर करण्यात आला आहे. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारही असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले.
मुकेश विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप आहे. मुकेशनने पीडितेला मल्याळी चित्रपट स्टार संघटना एएमएमएमध्ये सदस्यत्व मिळवून देण्याचे प्रलोभन देत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित अभिनेत्रीने त्याच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. मुकेश हा सत्तारुढ पक्षाचा आमदार असल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एसआयटीकडे याप्रकरणी तपास देण्यात आला होता.
Comments are closed.