शास्त्रीय संगीताचे रंग उलगडणारा ‘फागुनोत्सव’
धानी म्युझिक अँड कल्चरल फाऊंडेशनने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेला नवीन आयाम देणारा अनोखा संगीत महोत्सव आयोजित केला आहे. ‘चौथा फागुनोत्सव’ येत्या 22 मार्च रोजी भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी येथे सायंकाळी 5 वाजता होईल. वसंत ऋतुला समर्पित असलेल्या या महोत्सवात शास्त्रीय संगीताचे विविध रंग रसिकांसमोर येतील. फागुनोत्सवात पंडित पुर्बायान चॅटर्जी यांचे सतार वादन, पंडित रणजीत पाठक यांचे संतूर वादन तर विदुषी सावनी शेंडे यांची गायन मैफल होईल. कलाकारांना अनुब्रता चॅटर्जी, पंडित अजित पाठक, रोहित मुजुमदार तबला साथ करणार असून संवादिनीची साथ पंडित राहुल गोळे करणार आहेत.
Comments are closed.