लोहार चाळीत स्वस्त आणि मस्त लायटिंगची चलती, होलसेल आणि रिटेल विक्रीने रेकॉर्डब्रेक उलाढाल
यंदा दिवाळीच्या खरेदीला महागाईचे तोरण आहे. त्यामुळे जमेल तसे खिशाला परवडेल अशी खरेदी केली जात आहे. त्यासाठी स्वस्त आणि मस्त मार्पेटकडे ग्राहकांची पावले वळत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्पेटमधील लोहार चाळी लाईटिंग खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी तुडुंब भरल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम क्वॉलिटीच्या लाईट्स तेही होलसेल आणि रिटेल दरात खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी लोहार चाळ भागात गर्दी केली आहे. लोहार चाळीत चायना आणि इंडियन लाईट्स अशा दोन्ही प्रकारच्या उपलब्ध आहेत. विविध डिझाईन्स, रंग आणि व्हरायटीसह लाईट्स आहेत. अगदी 40-50 रुपयांपासून या लाईट्स मिळतात. याशिवाय झुंबराच्या आकारातील पंदिलांनाही मागणी आहे.
होलसेल आणि रिटेल दर
लोहार चाळीत साध्या नॉर्मल लाईट्स फक्त 40-50 रुपयांपासून सुरू होतात. या दरांमध्ये 50, 70, 80 आणि 100 रुपयांच्या विविध रेंज उपलब्ध आहेत. या लाईट्स साधारण 10-15 मीटर लांबीच्या असून विविध रंगांमध्ये मिळतात.
असे आहेत दर
फुलांचे तोरण 10 मीटर
200 रुपये, माळ 190 रुपये.
तोरण (100 बल्ब) 350 रु.
पट्ट्यांची लाईट लहान
550 रुपये, मोठी 1250 रुपये.
रिबन लाइट रु 200 (20 मीटर).
मल्टी कलर लाईट 10 मीटर रु 200, 80 मीटर रु 350.
स्टार लाइट रु 230.
बार लाईट लहान 150 रुपये, मोठी 230 रुपये.
18 पट लाईट 250 रु.
स्पॉट लाईट 60 रुपये.
रोप लाईट 30 रुपये प्रति मीटर, रनिंग रोप लाईट 200 रुपये, स्टार रोप लाईट 150 रुपये.
Comments are closed.