Makeup Products: मेकअप प्रॉडक्ट्स खरेदी करताना या गोष्टी तपासा

सणवार आले की नटूनथटून मिरवण्याची महिलांची लगबग असते. काहींना मेकअप करायला आवडतो. ही सौंदर्यप्रसाधने आपल्या मूळ सौंदर्यात अधिकच भर घालतात. मात्र तुम्हाला माहित आहे का हे मेकअप प्रोडक्ट्स खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे. कारण अनेकदा घाईत आपण नुसते नाव बघून ते विकत घेत असतो. मात्र असे न करता काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मेकअप प्रॉडक्ट्स खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजे ते जाणून घेऊया..

ब्रँड:

मेकअप प्रॉडक्ट्स घेताना ब्रँड बघून घ्यावी. कारण प्रत्येक ब्रँडची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. त्यानुसार योग्य ती माहिती घेतल्यावरच ते घ्यावे. यासाठी तुम्ही आधीच मेकअपची माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून माहिती घेऊन खरेदी करू शकता. ती व्यक्ती तुम्हाला ब्रँडच्या बाबतीत योग्य सल्ला देऊ शकते.

त्वचेचा प्रकार आणि रंग:

आपल्या त्वचेचा रंग आणि प्रकार लक्षात घेऊन ब्यूटी प्रॉडक्टस खरेदी करावी. कारण कोणाची त्वचा कोरडी असते तर कोणाची त्वचा तेलकट असते. त्यावरून फाऊंडेशन, लिपस्टीक यांसारख्या गोष्टींचा रंग निवडायला हवा. तरच ते तुमच्यावर चांगले दिसेल.

समाप्ती:

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण केवळ खाद्य पदार्थ नव्हे तर मेकअप प्रॉडक्ट्सना देखील एक्सपायरी असते. या प्रॉडक्टमधील घटक हे ठराविक काळानंतर एक्सपायर होणारे असू शकतात. त्यामुळे तुम्ही मेकअप करत असाल तर प्रॉडक्टची एक्सपायरी डेट आवर्जून तपासावी.

प्रॉडक्टवरची माहिती:

आपण खरेदी करत असलेल्या प्रॉडक्टसवर त्यातील घटक, त्यांचे प्रमाण यासंदर्भातील माहिती दिलेली असते. ती माहिती शांतपणे वाचा. त्याबद्दल काही शंका असेल तर संबंधित दुकानदारांना त्याबद्दल विचारा. त्यांना योग्य ते उत्तर देता येत नसेल तर मोबाइलवर त्याबद्दल सर्च करा.

उत्पादन कोड:

एखादे लिपस्टिक किंवा फाऊंडेशनचा रंग तुम्हाला सूट झाला असेल तर त्यावर एक कोड असतो. तो बघा म्हणजे पुढच्या वेळी हे खरेदी करताना तुम्ही या कोडनुसार ते प्रोडक्ट घेऊ शकता.

Comments are closed.