फुणगुस येथे केमिकलने भरलेला टँकर उलटला; गुगल मॅपमुळे चालक भरकटला

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येताना गुगल मॅपवर शॉर्टकट शोधून फुणगुसमार्गे प्रवास करणारा केमिकलने भरलेला आयशर टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅरल जंगलात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आयशर चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली.
कलरसाठी लागणारे 47 बॅरल घेऊन आयशर टेम्पो गोवा महामार्गावरून मुंबईकडे येत होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने फुणगुस आणि ऊक्षी मार्ग दाखवला. मात्र ऊक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्याने जाकादेवी फुणगुसमार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. फुणगुस येथे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका अवघड वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला. यामध्ये असलेले 47 बॅरलपैकी 30 बॅरल शिल्लक राहिले आहेत. बाकीचे बॅरल उतारावरील जंगलात वाहून गेले आहेत. आयशरचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटील यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला दिली पोलिस घटनास्थळी झाले आणि पंचनामा केला.
Comments are closed.