चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीची वाट आता वेगळी! आता खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 5 ट्रॉफी जिंकलेला महेंद्र सिंग धोनी सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या आयपीएल 2026 मध्ये त्याच्या खेळण्याबाबत चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने 2020 मध्येच निवृत्ती घेतली असली तरी धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. अलीकडच्या काळात सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात महेंद्र सिंग धोनी मुंबई इंडियन्सची जर्सी घालून दिसत आहे, ज्यामुळे सीएसके चाहत्यांमध्ये मोठी चिंता पसरली आहे.
सोशल मिडियावर महेंद्र सिंग धोनीचा एक फोटो व्हायरल होत आहे. यात तो 5 वेळा आयपीएल विजेता फ्रँचायझी मुंबई इंडियन्सची जर्सी घालून दिसत आहेत. प्रत्यक्षात धोनी एका फुटबॉल सामन्यादरम्यान स्लीव्हलेस मुंबई इंडियन्सची जर्सी घालून दिसला होता. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएलमध्ये नेहमीच जोरदार टक्कर पाहायला मिळते. दोन्ही फ्रँचायझींनी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. माहीच्या या फोटोमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. सोशल मिडियावर धोनी चेन्नई सुपर किंग्स सोडणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. तरीसुद्धा सध्या असे काही दिसत नाही.
आयपीएल 2024 पासून चेन्नई सुपर किंग्सची कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे आहे, पण मागील सीझनमध्ये त्याच्या दुखापतीमुळे महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपद सांभाळले होते. तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आता हार्दिक पांड्याकडे आहे. या दोन्ही फ्रँचायझींचा मागील 2 सीझनमधील कामगिरी फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीत आयपीएल 20256 साठी दोन्ही फ्रँचायझींनी आता पासूनच तयारी सुरू केली आहे. तरीही महेंद्र सिंग धोनी खेळणार की नाही, याबाबत चर्चा जोर धरून चालली आहे, ज्यावर धोनीने आतापर्यंत काहीही स्पष्ट केलेले नाही.
Comments are closed.