‘टेस्ट स्पेशालिस्ट’ चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा; टीम इंडियाची आणखी एक भिंत ढास
चेटेश्वर पुजारा सेवानिवृत्ती भारतीय क्रिकेटचे सर्व प्रकार : महान फलंदाज राहुल द्रविड यांच्या नंतर जर भारताच्या कसोटी संघाची नवी “भिंत” म्हणून कोणाला ओळखलं जात असेल, तर तो खेळाडू म्हणजे चेतेश्वर पुजारा. पण आता ही भिंतही ढासळली आहे. कारण, चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच व्यावसायिक घरेलू क्रिकेटमध्येही दिसणार नाही. चेतेश्वर पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले.
भारतीय जर्सी परिधान करणे, गीत गाणे आणि प्रत्येक वेळी मी मैदानावर पाऊल टाकत असताना प्रयत्न करीत आहे – खरोखर काय म्हणायचे आहे हे शब्दांमध्ये ठेवणे अशक्य आहे. परंतु जसे ते म्हणतात, सर्व चांगल्या गोष्टी संपल्या पाहिजेत आणि अफाट कृतज्ञतेने मी सर्व प्रकारच्या निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे… pic.twitter.com/p8yod5tfyt
– चेटेश्वर पूजा (@चेटेश्वर 1) ऑगस्ट 24, 2025
चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट करताना काय लिहिले?
चेतेश्वर पुजारा याने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने एक भावनिक पत्र लिहिलं आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की, “भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणं अशक्य आहे.
पुढे त्याने लिहिले की, पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!”
चेतेश्वर पुजाराची कारकीर्द
चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून 2023 पर्यंत त्याने 103 कसोटी आणि फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 15 धावा केल्या. तो 2013 ते 2014 पर्यंत या स्वरूपात खेळला. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही संधी मिळाली नाही.
त्याच वेळी, चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 19 शतके, 35 अर्धशतके आणि 3 द्विशतकांचा समावेश आहे. एका दशकाहून अधिक काळ, चेतेश्वर पुजाराला भारताच्या कसोटी संघाचा कणा म्हटले जात असे आणि अनेक प्रसंगी त्याने भारतीय संघाचा झेंडा उंचावला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.