चेतेश्वर पुजाराची निवृत्तीची घोषणा; चमकदार कारकिर्दीला अचानक ब्रेक
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. cheteshwar pujara announces retirement सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबद्दल माहिती दिली. तो बराच काळ भारतीय कसोटी संघातून बाहेर होता आणि आता त्याने आपल्या सुवर्ण कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे.
पुजाराने 2008 मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि पुढील दशकभर कसोटी संघाचा कणा म्हणून स्वतःला सिद्ध केले. तो ‘द्रविडनंतरचा भिंत’ म्हणून ओळखला जात होता. अवघड परिस्थितीत तासंतास क्रीजवर उभा राहून संघाला विजयाकडे नेण्याची कला पुजाराच्या कारकिर्दीत अनेकदा दिसून आली.
भारतीय जर्सी परिधान करणे, गीत गाणे आणि प्रत्येक वेळी मी मैदानावर पाऊल टाकत असताना प्रयत्न करीत आहे – खरोखर काय म्हणायचे आहे हे शब्दात ठेवणे अशक्य आहे. परंतु जसे ते म्हणतात, सर्व चांगल्या गोष्टी संपल्या पाहिजेत आणि अफाट कृतज्ञतेने मी सर्व प्रकारच्या निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे… pic.twitter.com/p8yod5tfyt
– चेटेश्वर पूजा (@चेटेश्वर 1) ऑगस्ट 24, 2025
त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 103 सामने खेळले आणि 7195 धावा फटकावल्या. या धावांत 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सारख्या परदेशी दौर्यांवर त्याने केलेली धडाकेबाज व लढाऊ खेळी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरली गेली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.