Cheteshwar Pujara Retirement – ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सध्या संक्रमणावस्थेत आहे. आर. अश्विन, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकामागोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने संघात पोकळी निर्माण झाली. त्यात आता टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा यानेही क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

चेतेश्वर पुजारा याने सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. हिंदुस्थानची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडता येणं आता अशक्य आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे. मी हिंदुस्थानी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

चेतेश्वर पुजाराने हिंदुस्थानसाठी 2023 मध्ये शेवटचा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. 2010 मध्ये चेतेश्वरने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. आणि तेव्हापासून 2023 पर्यंत चेतेश्वरने 103 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले. पुजाराने 103 कसोटी सामन्यांच्या 176 डावात 7195धावा केल्या, ज्यामध्ये 19 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

बॉर्डर-गावसकर करंडकात पडल्या तीन विकेट, अश्विनपाठोपाठ रोहित, विराटने घेतली निवृत्ती

Comments are closed.