या 4 गोलंदाजांना घाबरायचा चेतेश्वर पुजारा, स्वतःच केला खळबळजनक खुलासा!
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Team india’s legend batsman Cheteshwar Pujara) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रविवारी त्याने एक मोठी पोस्ट लिहून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “टीम इंडियाची भिंत” म्हणून ओळखला जाणारा पुजारा बऱ्याच काळापासून संघाबाहेर होता. मात्र आपल्या करिअरमध्ये त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दोन वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली असून त्यात पुजाराचा मोठा वाटा होता. निवृत्तीनंतर पुजाराने त्या चार गोलंदाजांची नावं सांगितली, ज्यांनी त्याला सर्वाधिक त्रास दिला. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पुजाराने खुलासा केला की, आपल्या करिअरमध्ये डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, जेम्स अँडरसन आणि पॅट कमिन्स हे चार गोलंदाज त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान ठरले.
तरीसुद्धा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पुजाराने जगातील कित्येक दिग्गज गोलंदाजांना दमवून सोडलं. मिचेल स्टार्क, कगिसो रबाडा यांसारखे विश्वस्तरीय गोलंदाजही पुजारासमोर अपयशी ठरले.
बराच काळ टीम इंडियाबाहेर असलेला पुजारा रविवारी अचानकच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने भारताकडून एकूण 103 कसोटी सामने खेळले. या काळात त्याने 43 च्या सरासरीने एकूण 7195 धावा केल्या. आपल्या कसोटी करिअरमध्ये त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली.
Comments are closed.