Chhagan Bhujbal answered Manoj Jarange criticism


मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने नाराज झालेल्या छगन भुजबळांनी अजित पवारांवर जाहीर टीका केली होती. त्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे खाते हे छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. अशामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसायचे काम करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली होती. मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळ यांनी जरांगेंवर प्रतिहल्ला केला आहे. (Chhagan Bhujbal answered Manoj Jarange criticism)

हेही वाचा : Manoj Jarange : मराठ्यांच्या आरक्षणाला…; भुजबळांची मंत्रिपदाची शपथ अन् जरांगेंचा हल्लबोल 

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका आणि खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगेनेच मराठा समाजाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत.” असा प्रतिहल्ला केला आहे. ते पुढे म्हणाले की, “खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो. पण या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या टीकेवर विचारले असता, ‘मी त्यांचे आभार मानतो.’ अशा शब्दात उत्तर दिले.

काय म्हणाले मनोज जरांगे?

मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, “जे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्यांना मंत्रिपद दिले जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांला तात्पुरता नादी लावले असेल, चॉकलेट दिले असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल. अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याचे काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल.” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. “छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सर्व आमदारांनी करायला हवा होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या, हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असेही ते म्हणाले.



Source link

Comments are closed.