कांद्याच्या कोसळत्या भावाचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद

कांद्याचे भाव कोसळू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत. त्याचे पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने मदत करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली
सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशात 24 रुपये दराने कांदा विक्री सुरू केली आहे. राज्यातही या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीत कांद्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा. त्यामुळे बाजारातील दर स्थिर राहतील असे भुजबळ म्हणाले. त्यावर नाफेडशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Comments are closed.