Chhagan Bhujbal meet CM Devendra Fadnavis at sagar bunglow asj
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रमुख अजित पवार यांच्यामध्ये शब्दरण रंगले आहे. अशामध्ये सोमवारी (23 डिसेंबर) नाराज छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तब्बल 40 मिनिटे यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीचा तपशील सर्वांसमोर मांडला. (Chhagan Bhujbal meet CM Devendra Fadnavis at sagar bunglow)
हेही वाचा : Divorce case : मुलीकडच्या मंडळींनी सासरी तळ ठोकून बसणे क्रूरताच, कलकत्ता हायकोर्टचे निरीक्षण
– Advertisement –
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, “मी आणि समीर भुजबळ, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अनेक बाबींवर त्यांच्याशी आम्ही चर्चा झाली. सामाजिक असो किंवा राजकीय मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याशी बोललो. आतापर्यंत काय काय घडलं? सध्या काय चालू आहे? याबाबत आम्ही चर्चा केली. यानंतर ते म्हणाले की, महायुतीच्या महाविजयात ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभले, हे आपण मान्यच करायला हवे. त्यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊनच, ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी मलाही आहे,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
“सध्या जे सुरू आहे, आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू,” असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिल्याचे सांगितले. तसेच, “मला विनंती केली आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीसांनी मला सांगितले,” असे छगन भुजबळांनी सांगितले आहे. दरम्यान, यावेळी त्यांना भाजपसोबत जाणार का? असा सवाल विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, “मला जे काही बोलायचे ते सर्व मी बोललो आहे. मी आता यावर अधिक काही बोलणार नाही,” असे म्हणत त्यांनी अधिकाची प्रतिक्रिया देणे टाळले.
Comments are closed.