Nashik- ‘आपला जन्म नाशिकचा…’ म्हणत पालकमंत्री पदासंदर्भात छगन भुजबळ यांचं मोठं विधान

छगन भुजबाल नशिक पालक मंत्री निवेदन

नाशिकच्या पालकमंत्री पदाचा (Guardian Minister of Nashik) प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तसेच 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा येत आहे. त्यावेळी कुंभमेळा मंत्री कोण असणार हे देखील अद्याप स्पष्ट नाही. महायुतीतील भाजप, अजित पवार गट आणि मिंधे गट तिघांचीही या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यात नुकतेच अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्याकडे पालकमंत्री पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच संदर्भात छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पद चर्चेत आले आहे. (Chhagan Bhujbal Makes Strong Statement on Guardian Minister of Nashik).

‘आपला जन्म मुळात नाशिकचा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून नाशिकच्या विकासासाठी आपण अनेक महत्वपूर्ण कामे केलेली आहे. मी नाशिकचा बालक आहे त्यामुळे पालक होईल की नाही याची मला चिंता नाही’, असं विधान करत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात बॉल टाकला आहे.

तसेच पालकमंत्री पदासोबतच कुंभमेळ्याचा उल्लेख करत भुजबळ पुढे म्हणाले की, ‘आगामी काळात पालकमंत्री असेल किंवा कुठली पदे असतील आपल्याला जे पद मिळेल त्यामाध्यमातून नाशिकच्या आगामी कुंभमेळासह नाशिकच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू ही सर्व कामे मार्गी लावली जातील’.

Comments are closed.