राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण एकट्यादुकट्याने नाही, गळ्यात हात घालून निर्णय घ्यावा लागेल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आज सूचक विधान केले. एकट्यादुकट्याने चर्चेला जाऊन काही होत नाही; क्रिकेट संघासारखे एकत्र येऊन गळ्यात हात घालून निर्णय घ्यावा लागेल, असे भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, असे छगन भुजबळ यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले होते. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, कोण कोणाला भेटायला जातेय हे फक्त आम्हाला टीव्हीवरूनच समजतेय; पक्षांतर्गत मात्र यासंदर्भात काहीच चर्चा झालेली नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाल्यानंतर दोन्ही शिवसेनाही एकत्र येऊ शकतील का, असे छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘माझ्या आयुष्यात मला दोनच नेते आणि मार्गदर्शक लाभले; एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. त्यामुळे दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास जुन्या लोकांना आनंदच होईल,’ असे भुजबळ म्हणाले. सगळे एकत्र आल्यावर सगळे एनडीएमध्येच येतील का, याबद्दल आपणही विचारात पडलोय, अशी मिश्कील प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Comments are closed.