Chhagan Bhujbal to take oath as Food and Civil Supplies Minister on May 20


महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 20 दिवसांनंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी महायुतीच्या एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु, या विस्तारामधून भाजपाच्या, शिवसेनेच्या (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अनेक ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांना डच्चू देण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश होता. मात्र छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे छगन भुजबळ यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. (Chhagan Bhujbal to take oath as Food and Civil Supplies Minister on May 20)

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असूनही विधानसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. कारण मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत छगन भुजबळ यांनी अनेकदा बोलून दाखवली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवारांवरही टीका केली होती. मात्र आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी (20 मे) सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

हेही वाचा – Narkatla Swarg Book : गृहमंत्रीपदासाठी माझा विचार करताना त्यांना भीती वाटली असेल; मुश्रीफ यांचा पवारांवर निशाणा

भुजबळांना धनंजय मुंडेंचं खातं मिळण्याची शक्यता

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली. यानंतर भाजपा आमदार सुरेश धस आणि विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मृत संतोष देशमुख यांचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा खाते होते. हे खाते आता छगन भुजबळ यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – Pahalgam Attack : महिना उलटला, दहशतवादी कुठे? मोदींना सवाल करत आंबेडकर म्हणाले, पीडितांच्या पत्नी…



Source link

Comments are closed.