आधी शिवीगाळ मग बेदम मारहाण, 4 तरुणांनी मित्राला संपवले, छ. संभाजीनगरमध्ये खळबळ CCTVत घटना कैद
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 तरुणांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे .रविवारी पहाटे ( 2 फेब्रुवारी ) छत्रपती संभाजीनगरच्या संसारनगर भागात ही घटना घडली .विशेष म्हणजे शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून 200 मीटर अंतरावर तरुणाला मारहाण करण्यात आली होती .कल्पेश विजय रुपेकर असं या 24 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे .विजयला मित्रांनी मारहाण केल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे . (Murder Case)
या घटनेनंतर मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांना अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे .राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्यांचे प्रमाण वाढलं असून किरकोळ कारणांमधून होणारी मारहाण, बेदम मारहाणीतून झालेले मृत्यू, होत असताना गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे .
मारहाणीपासून खुनापर्यंत घडलं काय ?
छत्रपती संभाजीनगरच्या संसारनगर भागामध्ये रविवारी (दि .2 फेब्रुवारी ) धक्कादायक घटना घडली .चार मित्रांनी मिळूनच 24 वर्षीय तरुणाला संपवल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .कल्पेश विजय रुपेकर असा या 24 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे .मृत तरुणाच्या भावाने अविनाश रूपे करणे दिलेल्या फिर्यादीनुसार कल्पेश हा आरोपीं सोबत शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाईन शॉप जवळ दिसला .चुलत भावाने त्याला घरी जाण्यास सांगितले पण कल्पेशने स्वतःची दुचाकी तिथेच सोडून मित्रांसोबत संसारनगरमध्ये आला . दरम्यान , क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री दीडच्या सुमारास काही तरुण गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . घटनास्थळी धाव घेत पोलीस पोहोचले तेव्हा तिथे कोणीही आढळले नाही .सकाळी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात या भागात तरुण शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्पेशसह त्याच्या मित्रांना ठाण्यात आणले गेले .समज देऊन , माफीनामा लिहून घेत पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास सोडून दिले . पोलीस ठाण्याच्या बाहेर गेल्यानंतरच काही वेळाने ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे .या घटनेचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत आहेत .
मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
छत्रपती संभाजीनगर शहरातील संसारनगर भागात चार तरुण एका तरुणास जबर मारहाण करत असल्याचं फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे .शिवाय रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात संसारनगर भागामध्ये काही तरुण गोंधळ घालत असल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली होती .त्यानंतर कल्पेश सह मित्रांना ठाण्यात आणलं गेलं होतं . त्यामुळे वादाच रूपांतर मारहाणीत आणि मारहाणीचं खुनापर्यंत गेल्याचा अंदाज आहे .घटनेचा पुढील तपास सुरू असून चार जणांवर खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती आहे .
हेही वाचा:
एल
अधिक पाहा..
Comments are closed.