मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या पत्नीने संपवलं जीवन; पतीकडून धमक्या, अनैतिक संबंधामुळे विवाहिता

छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक छळ, मानसिक त्रास आणि पतीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावमधील शेपू विवाहित महिलेने गळफास घेत आयुष्य संपवलं. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे आणि सततच्या मानसिक छळामुळे तिने टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. तसा गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Crime News)

अमोल लघाणे हा कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा मृदंगाचार्य म्हणून ओळखला जात होता. कीर्तनामध्ये मृदंग वाजवणाऱ्या पतीचे पत्नीवर होणारे मानसिक छळ आणि अनैतिक संबंध यामुळे जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. या प्रकरणानंतर पतीच्या सततच्या छळामुळेच काजलने टोकाचा निर्णय घेतला” असा आरोप करत अमोल लघाणे याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी विवाहितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

नेमके प्रकरण काय?

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील शेतकरी आण्णासाहेब केशवराव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी काजल हिचे लग्न 25 मार्च 2025 रोजी रांजणगाव शेनपुंजी येथील  मृदुंगाचार्य अमोल बाबासाहेब लघाणे याच्याशी पारंपरिक पद्धतीने झाले होते. अमोल लघाणे हा कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा मृदंगाचार्य म्हणून ओळखला जात होता.

लग्नानंतर सुरुवातीला काजलचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काही महिन्यांनंतर अमोल याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. या कारणावरून काजल हिला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता. यासोबतच पतीकडून वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काजलने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी दिवाळीच्या सुमारास अमोल याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने उद्धट वर्तन करत कोणतीही सुधारणा न दाखवता उलट धमक्या दिल्याचेही समोर आले आहे.

मृदंगाचार्य लाघाने महाराजांच्या पत्नीची आत्महत्या

दरम्यान, 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 7:20 वाजण्याच्या सुमारास काजल हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या सासऱ्यांनी ही माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी “पतीच्या सततच्या छळामुळेच काजलने टोकाचा निर्णय घेतला” असा आरोप करत अमोल लघाणे याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.