गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वाद, लेकीची हत्या करून आईनेच…, छत्रपत
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना (Chhatrapati Sambhajinagar Crime News) उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदणी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.(Chhatrapati Sambhajinagar Crime News) या घटनेचा उलगडा झाला आहे, तर मुलीला आईनेच गळा आनळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रेमप्रकरणाला विरोध करत आईने २१ वर्षीय मुलीचा प्लास्टिक पाइपने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गादीत गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तिसगाव चौफुली पुलाजवळ पोलिस तपासात उघड झाला. १९ फेब्रुवारीला रात्री डायल ११२ पथकाला तिसगाव चौफुली पुलाजवळ एका रिक्षामध्ये संशयास्पदरीत्या गादी व घरगुती साहित्य नेले जात असल्याची माहिती रिक्षाचालकाद्वारेच मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक महिला व पुरुष आढळले. त्यांच्या शेजारी प्लास्टिकचा ड्रम आणि दोरीने घट्ट बांधलेली गादी होती. चौकशीदरम्यान उत्तरे समाधानकारक न वाटल्याने पथकाने गादी उघडून पाहिली. त्यामध्ये अंदाजे २० वर्षाची तरुणी आढळली. यावेळी लेकीने आत्महत्या केल्याचे आईने सांगितले. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. तरुणीचे नाव नंदिनी राजू धिवरे आहे. आई भारती उमेश साबळे (३५) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मृत मृत तरुणीचे कन्नड येथील युवकासोबत प्रेमसंबंध होते. विवाहासाठी ती आग्रह धरत होती; मात्र आईचा विरोध होता. मागील काही दिवसांपासून घरात वाद सुरू होते. त्यातूनच खून केल्याचे तपासात समोर आले.
नेमकं काय घडलं? (Chhatrapati Sambhajinagar Crime News)
आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचं आहे म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली. रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याच दिसलं. सामान भरताना त्याच्या लक्षात आलं, त्याने त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की, त्या गादीमध्ये काहीतरी ठेवलेले साहित्य आहे, त्यात काही संशयास्पद आहे. पोलिसानी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली. मुलीचे अफेअर होते. त्यामुळे तिने गळफास घेतला. आम्ही गावी घेऊन निघालो होतो, असे आईने सांगितले होते.
आणखी वाचा
Comments are closed.