संभाजीनगर दरोडा प्रकरणात मोठी अपडेट! एन्काउंटर झालेल्या आरोपीनेच पहिली गोळी झाडली; मैत्रिणीच्या
छत्रपती संभाजीनगर गुन्हे: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा (Santosh Ladda) यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी मोठा दरोडा पडला होता. आता या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकरनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडल्याचा जबाब त्याच्या मैत्रीणीने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
एन्काउंटरच्या वेळी अमोल खोतकरच्या गाडीत त्याची मैत्रीण खुशी शेख देखील उपस्थित होती. ती या घटनेची प्रत्यक्षदर्शी असून, तिचा जबाब आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. यामुळे पोलिसांना त्यांच्या कारवाईसाठी क्लीनचिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खुशी शेखचा ताबा देण्यासाठी पोलिसांचे सीआयडीला पत्र
तसेच उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणात चोरी गेलेल्या सोन्यापैकी अजूनही 5 किलो सोन मिळालेलं नाही. केवळ 60 तोळेच सोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमोल खोतकरच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करत असून त्याची मैत्रीण खुशी शेख ही प्रत्यक्षदर्शी आहे. त्यामुळे ती सीआयडीच्या ताब्यात आहे. तर खुशी शेखचा ताबा देण्यासाठी पोलिसांनी आता सीआयडीला पत्र पाठवले आहे. चोरीनंतर पुढचे काही दिवस आणि एन्काऊंटरवेळी अमोल खोतकरची मैत्रीण खुशी शेख ही त्याच्यासोबत होती. तर उर्वरित 5 किलो सोन्याचा तपास लावण्यासाठी खुशीची चौकशी करायची असल्याने पोलिसांकडे तिचा ताबा मिळावा, यासाठी सीआयडीला पत्र पाठवण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी 14 मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं 32 किलो चांदी आणि 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. पोलिसांकडून 15 तारखेला सकाळपासून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. सुरुवातीला पोलिसांनी वॉचमन असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. तब्बल 10 दिवस या प्रकरणात एकही आरोपीला अटक झालेली नव्हती. यानंतर या प्रकरणात 16 जणांना अटक करण्यात आली. तर मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. यावेळी अमोलकडून पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी अमोल याच्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अमोल खोतकर हा जागीच ठार झाला होता. आता या प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला आहे. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या मुख्य आरोपी अमोल खोतकरनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडल्याचा जबाब त्याच्या मैत्रीणीने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.