शासकीय खतांच्या बॅगांमधून बनावट खतांची विक्री; सिल्लोडमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये (Sillod) कृषी विभागाने मोठी कारवाई करत बनावट खत (Fake Fertilizers) तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारला आहे. ज्यात बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. विविध कंपन्यांची खते आणून ती मिक्सकरून त्यांची काळ्या बाजारात विक्री केले जात असल्याच्या संशय होईल. याच खताच्या एका गोदामावर सिल्लोड येथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रक पथकाने काल (6 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता छापा टाकला होता. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. यावेळी जवळपास 3 हजार खताच्या गोण्या जप्त केल्याची माहिती मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द शिवारात अनधिकृत रित्या खतांचे पॅकिंग केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी विभागाने हि मोठी कारवाई केली आहे.
अंबादास दानवे : متانच्या चोरीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी
दरम्यानाहीया प्रकरणी मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. बनावट खत तयार करणारा कारखाना भाजप कार्यकर्त्यांचा असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द शिवारात अनधिकृत रित्या खतांचे पॅकिंग केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी विभागाने हि मोठी कारवाई केली आहे.
Fake Fertilizers : शासकीय खतांच्या बॅगांमध्ये बोगस खत भरण्याचा प्रकार
सिल्लोडचे कृषी अधिकारी प्रमोद डापके यांना निनावी क्रमांकावरून एक व्हिडिओ प्राप्त झाला होता. त्या व्हिडिओमध्ये मोढा खुर्द शिवारातील एका गोडाऊनमध्ये अनधिकृतपणे खतांची पॅकिंग सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाने तत्काळ शहानिशा करण्याचे ठरवले. त्यानुसार गट क्रमांक 17 मधील ‘लीप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स’ या कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. 18-18-10, 10-20-20 अशी खंत निर्मिती होत होती. या कारवाईदरम्यान संशयास्पद पॅकिंग साहित्य, रिकामे खतांचे पोते आणि विविध प्रकारची रासायनिक सामग्री आढळल्याचे समजते. संबंधित प्रकरणात पुढील तपास सिल्लोड पोलीस आणि कृषी विभागाकडून सुरू आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.