छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने, मतदान केंद्रावर तणाव

छत्रपती संभाजीनगर नगरपालिका निवडणूक आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे तर काही ठिकाणी पैसे वाटप करुन गेल्यासह मतदान करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजी नगरमध्ये (छत्रपती संभाजीनगर नगरपालिका निवडणूक) गुजराती कन्या विद्यालयात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजप आणि शिवसेा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे.

शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

भाजपचे कार्यकर्ते कसे थांबले म्हणत शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला होता. यानंतर मतदान केंद्राच्या आतमध्ये कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. या घटनेनंतर मतदान केंद्राच्या बाहेर काही काळ तणावाचं वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रा बाहेरच पैशाचे वाटप सुरु असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील नारेगाव प्रभाग क्रमांक 9 मधील हा प्रकार असल्याची माहिती मिळत आहे. मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव मराठी या बूथ केंद्राच्या बाहेरच पत्र्याच्या शेडमध्ये पैसे वाटप करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. जुबेर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स नावाच्या छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये चिठ्ठी घेऊन जाणाऱ्याला पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ आहे. काल याच भागात पैसे वाटपावरुन दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार समोर आला होता.

राजकीय पूर्ववैमन्यासातून सोलापुरात खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटात वाद झाल्याची घटना

राजकीय पूर्ववैमन्यासातून खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही गटातील एक एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या भांडणानंतर पोलीस उपायुक्तसह पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले आहेत. साडे पाच वाजण्याच्या आधी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांची मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. दरम्यान, सोलापुरात मतदान संपल्यानंतर शहरात काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर खुद्द पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळं सोलापुरात काही काठ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा

Comments are closed.