छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनाला भाजपचा मोठा धक्का, महिला जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना शिंदे गटाला भाजपने जोरदार धक्का दिली आहे. शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते वाडकर यांनी भाजपा प्रवेश केला. त्यांसोबतच काही महिला कार्यकर्त्यांनी आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन हालचाली पाहायला मिळत आहेत.

शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशावरुन तू तू मै मै सुरू असतानाच शिंदे लेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षांना भाजपाने प्रवेश दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला महायुतीतीलच भाजपाने मोठा धक्का दिला आहे. त्यामुळं राजकीय वातावरण गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते वाडकर यांनी भाजपा प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळं राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

हिंगोली दहशतीखाली! शहरातील अवैध धंद्यांना आमदार संजय बांगरांचा आश्रय, नागेश पाटील आष्टीकरांचा हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.