भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती! आम्ही काय बांगड्या घालून बसलोय का? राष्ट्रवादी आक्रमक

छत्रपती संभाजीनगर वार्ता: खुलताबाद पंचायत समितीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर मिठाचा खडा पडला आहे. आमच्याशी कुठलीही चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्याचं काम भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. याचे उत्तर आता भाजपला मिळेल, आम्ही काय बांगड्या घालून बसलो नाही, या सगळ्या संबंधी भाजप पक्ष नेतृत्वाकडे यासंबंधीची तक्रार करणार असल्याचे सतीश चव्हाण म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजपचे 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक सदस्य होता.  या पंचायत समितीमध्ये भाजपकडे सभापतीपद तर आमच्याकडे उपसभापती पद येणार होतं.  मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची कुठलीही चर्चा न करता भाजपच्या स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत खुलताबाद पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी प्रशांत बंब यांनी ठाकरेंच्या शिवसेना जवळ करत त्यांना उपसभापती पद दिले. युती धर्म त्यांनी पाळला नाही आणि याची तक्रार आम्ही भाजपच्या नेतृत्वाकडे करणार आहोत असे आमदार सतिश चव्हाण म्हणाले.

आम्ही बांगड्या घालून बसलो नाही,  याचे उत्तर आम्ही देऊ

जर अशाप्रकारे युतीमध्ये काम केले जात असेल तर नक्कीच बाकीच्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष बसवायचा असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मदत त्यांना लागणार आहे. त्यावेळी आम्ही काय करायचं ते बघू. आम्ही बांगड्या घालून बसलो नाही याचे उत्तर आम्ही त्यांना देऊ असेही सतिश चव्हाण यावेळी म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.