सासरचा जाच, विवाहीत महिलेनं टीसीचं कारण सांगून सोडलं घर, क्राइम ब्रँचचे पथक थेट पुण्यात
छत्रपती संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीचा दीड वर्षापुर्वी जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक असलेल्या तरुणाशी विवाह झाला होता. 19 जुलैला सासरच्या जाचाला कंटाळून त्या तरुणीने शहरातील एका नामांकित महाविद्यालयातुन टीसी काढून आणते असे सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत तिचा फोन देखील बंद असल्याने तिच्या पतीने तत्काळ सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती.
विश्रांतवाडी, कोथरुड पोलिसांच्या मदतीने तरुणीला पुण्यातून घेतलं ताब्यात
सातारा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली. नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेजस्वीच्या मोबाईचे सीडीआर पोलिसांनी काढले. तेजस्वीने तीच्या फोन मधील जुने सीमकार्ड काढुन नवीन टाकले आहे. तेजस्वीचे सासरे हे सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहेत. तेजस्वीचे फाईन आर्टचे शिक्षण झालेले आहे. तेजस्वीच्या सासऱ्याने 27 जुलैला पोलीस आुयक्तांची घेतली भेट घेतली होती. तेजस्वीच्या सासरे पोलिस दलात असल्याने त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अमोल कामठे यांच्याकडे सोपवला होता. 31 जुलैला दोन पथके स्थापन करण्यात आली होती. सातारा पोलिस, क्राइम ब्रांचचे पोलिसांचे पथक थेट पुण्यात गेले. पुण्यात पोलिस गेल्यानंतर विश्रांतवाडी, कोथरुड पोलिसांच्या मदतीने तरुणीला ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.