लबाडोंना पाणी द्या… आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून निघाला शिवसेनेचा विराट मोर्चा

हातात भगवा झेंडा… मागे हजारोंच्या समुदायाला सोबत घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून हल्लाबोल मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला देखील हातात हंडे घेऊन सहभागी झाल्या आहेत. यावेळी पाणी द्या पाणी द्या, लबाडांनो पाणी द्या अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.

महापालिका प्रशासनाच्या निष्ठूर कारभारामुळे शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाच दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन असतानाही बारा ते पंधरा दिवसांनी शहराला पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात येत आहे

https://www.youtube.com/watch?v=9qk4nptuevo

Comments are closed.