शाळेच्या निर्जन मैदानावर अंधारात ऑम्लेट सेंटरवर काम करणाऱ्या तरूणाच्या गळ्यावर फिरवला चाकू; दार


छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील एसएफएस शाळेच्या मैदानावर तरुणाची गळा चिरून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. आमलेटच्या दुकानावर काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याची खळबळ घटना उघडकीस आली आहे. जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मैदानावर ही घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरेश भगवान उंबरकर (वय ३०) राहणार कैलास नगर असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.  सुरेश उंबरकर यांचा खून नेमका कोणी केला? खून करण्यामागचा उद्देश काय होता? ओळखीच्यांनी खून केला असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)

Chhatrapati Sambhajinagar Crime News: सुरेश हा कूक होता

मिळालेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या निर्जन मैदानावर ही घटना काल (मंगळवारी) रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ही माहिती कळताच जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू करून संशयितांची धरपकड सुरू केली होती.

Crime News: अंधारात काहीतरी विचित्र घडत…

पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, सुरेश हा कूक होता. जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर रात्री कायम अंधार असतो. त्यामुळे हे मैदान रात्रभर मद्यपी आणि नशा करणाऱ्यांचा अड्डा बनलेले असते. मंगळवारी रात्री मैदानावर अंधारात काहीतरी विचित्र घडत असल्याचे दुसऱ्या मद्यपींनी पाहिले. त्यावेळी ते तिकडे गेले असता काही जणांनी एका तरुणाचा गळा चिरला आणि ते पळून जात असल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी जवाहरनगर पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे भयंकर दृश्य घटनास्थळी दिसून आले.

पोलिसांनी मृताची ओळख पटविली. त्याचे नाव सुरेश उंबरकर असल्याचे समोर आले. ही माहिती मृताच्या नातेवाइकांपर्यंत व नजीकच्या कैलासनगर, विष्णूनगर, भानुदासनगर परिसरात पसरताच अनेक बघ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Chhatrapati Sambhajinagar Crime News: तो करायचा ऑम्लेट सेंटरवर काम

गेल्या काही दिवसांपासून सुरेश हा हेडगेवार रुग्णालयासमोरील ऑम्लेट सेंटरवर काम करीत होता. लग्नानंतर काही वर्षांतच त्याचा घटस्फोट झाला होता. मंगळवारी रात्री तो मित्रासोबत कैलासनगर येथे दिसला होता, असे घटनास्थळी आलेल्या लोकांनी सांगितले. त्याची हत्या कोणी केली आणि हत्येचे कारण काय? याचा शोध पोलिसांनी सुरू केला.

आणखी वाचा

Comments are closed.