विमानतळाजवळ आज भव्य शिवजयंती उत्सव, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विलेपार्ले येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळय़ाजवळ आज शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची या सोहळय़ाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शिवरायांचा पुतळा दिमाखात उभा असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथे भारतीय कामगार सेनेने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळय़ाला शिवसेना नेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, अॅड. अनिल परब, उपनेते सचिन अहिर, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस संजय कदम उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.