कोल्हापूरात सरकारची मोघलशाही; शिवशंभूद्रोहींना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यापूर्वीच शिवप्रेमींना घेतलं ताब्यात

छत्रपती-श्वाजी-महाराज-प्रेमी-विवेकी-विवेकी-अगदी आधी-ते-महायत-सरकारच्या विरुद्ध-ते-पुरातन

तमाम हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर आणि केशव‌ वैद्यला हे‌ सरकार पाठीशी घालत असल्याचा प्रत्यय येत असल्याची टीका होत आहे.

सायंकाळी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री ‘जबाब दो’ असा जाब विचारण्यासह,काळे झेंडे दाखवून निषेध करण्यापूर्वीच सकाळी इंडिया आघाडीसह शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घरातून अज्ञातस्थळी स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ऐतिहासिक किल्ले पन्हाळा गडावर छत्रपती शिवरायांच्या एका कलाकृतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत. त्यांच्याकडेच गृहमंत्री पद असतानाही त्यांनी या शिवशंभूद्रोहींवर कारवाई करण्यास विलंब लावला. त्यात महायुतीचा एकही आमदार, खासदार मंत्री याविरोधात ब्र सुद्धा काढत नसल्याने आणि शिवप्रेमींच्या या धरपकडीमुळे सध्या कोल्हापूरात मोघलशाहीचे वातावरण दिसून येत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर याला प्रथम अटक करा. त्याला मिळालेल्या अंतरिम जामीन विरोधात सरकारने उच्च न्यायालयात कारवाई करावी, मगच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात यावे असे आवाहन इंडिया आघाडी तसेच शिवप्रेमींकडून करण्यात आले होते. पण त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने, आज कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या निषेधार्थ आंदोलनावर इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी ठाम राहिले. तसेच गनिमी काव्यासह सायंकाळी खानविलकर चौकात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

दरम्यान आज सकाळीच पोलिसांच्या फौजफाट्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, कोल्हापूर सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, हर्षल‌ सुर्वे, काँग्रेसचे संजय पवार-वाईकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आर.के. पोवार, आपचे संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, संभाजी जगदाळे, प्रवीण पाटील, शुभम शिरहट्टी, रवी जाधव,चंद्रकांत यादव आदींसह 30 ते 40 शिवप्रेमी आंदोलकांची धरपकड करून‌, विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सर्वांना स्थानबद्ध करण्यात आले. दिवसभर इतरही शिवप्रेमी आंदोलकांची धरपकड सुरूच होती.

Comments are closed.