छत्रपती उदयनराजेंची दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एन्ट्री; कॉलर उडवली, फ्लाईंग किसही दिली, VIDE

छत्रपती उदयनराजे भोसाले साताऱ्यातील (Satara News) तालीम संघ मैदानावर आज छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) मित्र समूहाच्यावतीने शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी सोहळ्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. यामध्ये आज सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थर रचत यावर्षीची 4 लाख44 हजार 444 रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकले आहे. यावेळी मोठ्या संख्येने साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमास उपस्थित होते.

साताऱ्यातील दहीहंडीच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांची एन्ट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातपात मानली नाही आणि मी देखील जातपत मानत नाही. तुमचे आणि माझे एकच रक्त असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. तू मोठा मी लहान असा म्हणायचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. अपघात झाल्यावर रक्त देताना कोणी जातपात का बघत नाही. ज्यांनी जातपात मांडली ती स्वतःच्या स्वार्थासाठी…,असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी हटके स्टाईलने कॉलर उडवत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

वाईत पाण्यातील दहीहंडी-

सातारा जिल्ह्यातील वाई येथील रविवार पेठ गोविंदा पथक मंडळाच्यावतीने दरवर्षी पाण्यातील दहीहंडीचे आयोजन केले जाते. या गोविंदा पथकाचे हे 13 वे वर्ष असून पाण्यातील दहीहंडी….. हे या दहीहंडीचे प्रमुख आकर्षण आहे. पाण्यामध्ये पाच थर तयार करुन ही दहीहंडी फोडली जाते. सातारा जिल्हयातील अनोखा दहिहंडीचा सोहळा वाई येथे पहायला मिळाला ही दहिहंडी फोडण्यासाठी कृष्णा नदी जवळच असणाऱ्या एका ओढ्याच्या प्रवाहात उभे राहुन सर्व गोविंदा… 5 थर करुन ही दहीहंडी फोडतात. याठिकाणी चारही बाजुला पाणी असल्यामुळे गोविंदाना कमी दुखापत होत असल्यामुळे या दहिहंडीचा वेगळपण याठिकाणी पहायला मिळतं. या पथकाच्या वतीने विशेष काळजी घेऊन रविवार पेठ गोविंदा पथक मंडळ वाई यांनी ही पाच थराची दहिहंडी फोडली. दहिहंडी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने वाईकरांनी गर्दी केली होती.

https://www.youtube.com/watch?v=1A5BH0CB9O8

संबंधित बातमी:

Abhijit Bichukale Warns On Marathi Hindi Controversy: ‘उदयनराजे सभ्य असतील, पण मी…’, मराठी-हिंदी भाषावादावर बोलताना अभिजीत बिचुकलेंचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.