‘छावा’ची 300 कोटी क्लबमध्ये एण्ट्री

'छावा' या सिनेमाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने नऊ दिवसांत 300 कोटी क्लबमध्ये एण्ट्री घेतली आहे. 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत ‘छावा’ने तब्बल 225.28 कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्हॅलेंटाइन डेला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘छावा’ने रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर-आलियाच्या ‘गल्ली बॉय’ या सिनेमाच्या नावावर होता.

पहिल्या आठवडय़ात 225 कोटी कमाई केल्यावर या सिनेमाने आठव्या दिवशी 24.03 कोटी रुपये कमावले, तर नवव्या दिवशी दुसरा शनिवार असूनही कलेक्शनमध्ये 87 टक्क्यांची मोठी वाढ झाली. अशा प्रकारे एकूण नऊ दिवसांचे कलेक्शन तब्बल 293.41 कोटी रुपये इतके झाले. नवव्या दिवशी सिनेमाने मुंबईत 74 टक्के, पुण्यात 85.75 टक्के आणि चेन्नईत 81.50 टक्के इतके कलेक्शन केले.

Comments are closed.