मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भगवान रामाची प्रार्थना केली.
वृत्तसंस्था/ अयोध्या
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी रामनगरी अयोध्येचा दौरा केला आहे. नायडू यांनी राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेत पूजन केले आहे. याचबरोबर त्यांनी सप्तऋषी मंदिरात जात दर्शन-पूजन केले आहे. श्रीरामलल्ला आणि राम दरबारचे दर्शन करण्यासह त्यांनी जन्मभूमी परिसराचे भ्रमण केले आहे. यादरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी नायडू यांना मंदिराच्या निर्मित कार्यांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. राम मंदिर परिसराची भव्यता पाहून नायडू हे भारावून गेल्याचे दिसून आले.
रामराज्य कुठल्याही सरकारसाठी बेंचमार्क आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारण्यात मदत केलेल्या सर्व लोकांचे मी कौतुक करतो. हे भारतासाठी एक अध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. अयोध्या मंदिर अध्यात्मि महत्त्व वाढविण्यात अत्यंत मोठी भूमिका बजावणार असल्याचे उद्गार नायडू यानी काढले आहेत.
उत्तरप्रदेश विकासाप्रकरणी चांगली कामगिरी करत आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार ही राज्ये विकसित झाली तर आम्ही विकसित भारताचे उद्दिष्ट लवकर गाठू शकतो. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगले काम करत आहेत असेही नायडू यांनी म्हटले आहे.
Comments are closed.