पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे.
शेतकऱ्यांना करण्यात आलेली मदत –
– राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना सरसकट मदत मिळणार आहे. 2069 मंडळांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.
– ज्यांची घरं पूर्णपणे पडली आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देणार आहोत. पडझड झालीय त्यांना देखील मदत दिली जाणार आहे.
– दुधाळ जनावरांना 37500 रुपयांप्रमाणे प्रती जनावर अशी मदत करणार आहोत. एनडीआरएफमधली तीन जनावरांची मर्यादा काढून टाकली आहे.
– ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32 हजार रुपये प्रती जनावर
– कुक्कुटपालनासाठी 100 रुपये प्रती कोंबडी.
– खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्याला माती आणावी लागणार आहे 47 हजार रुपये हेक्टरी रोख रक्कम देणार. तीन लाख रुपये नरेगाच्या माध्यमांतून देणार.
– बाधित विहिरी ज्यात गाळ गेलाय त्यासाठी 30000 रुपये प्रती विहीर दिले जाणार.
– इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता दहा हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
– शालेय महाविद्यालयीन मुलांना परिक्षा शुल्क माफी
– शेतीच्या वीजपंपाच्या पुर्नजोडणीसाठी मदत केली जाईल.
– 65 लाख हेक्टरसाठी 6176 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
– कोरडवाहूच्या शेतकऱ्याला 18 हजार प्रती हेक्टरी
– हंगामी शेतकऱ्याला 27 हजार प्रती हेक्टरी
– बागायती शेतकऱ्याला 32 हजार प्रती हेक्टरी
– या व्यतिरिक्त ज्या 45 लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे. विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांचं पूर्ण नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना 17 हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.
Comments are closed.