राष्ट्रवादीचे विलीनीकरणच; दिल्लीहून परतताच फडणवीसांचे सूर झाले मवाळ… हळवे!
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री अचानक दिल्ली गाठत भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांचे दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे सूर काहीसे मवाळ आणि हळवे झाल्याचे दिसले.
विलीनीकरणाचा जो काही विषय आहे तो त्यांच्या पक्षाचा आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही. त्यांचा पक्ष त्याबाबत योग्य ते बोलेल. पण आज ती वेळ आलेली नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ते आम्हाला अधिकृतरीत्या सांगतील की आमचे काही ठरले आहे!
सुनेत्रा पवार आज मोदी-शहांना भेटणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेदेखील असणार आहेत. उद्या बुधवारी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. त्यांची ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी फडणवीसांच्या दौऱ्यानंतर लागलीच होणाऱ्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments are closed.