मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंगापूर दौऱ्यावर पाठवलेले शुल्क
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी 6,650 कोटीच्या गुंतवणुकीचे करार
वृत्तसंस्था/ सिंगापूर
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी स्वत:च्या सिंगापूर दौऱ्याच्या पहिल्या दिवशी उत्तरप्रदेशासाठी 6650 कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केली आहे. सिंगापूर येथील युनिव्हर्सल सक्सेस ग्रूपसोबत झालेल्या बैठकीत हे यश मिळाले असून ज्यात ग्रूप हाउसिंग, लॉजिस्टिक्स अणि डाटा सेंटर यासारख्या रणनीतिक क्षेत्रांसाठी तीन सामंजस्य करार झाले आहेत.
मुख्यमंत्री योगींनी उत्कृष्ट संपर्कव्यवस्था आणि पारदर्शक धोरणांचा दाखला देत जागतिक गुंतवणुकदारांना आमंत्रित केले. या प्रकल्पांना मूर्त रुप मिळाल्यावर राज्यातील जवळपास 20 हजार युवांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
जेवरमध्ये आंतरराष्ट्रीय टाउनशिप
युनिव्हर्सल सक्सेस ग्रूपसोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक 100 एकरच्या भूमीवर एक आंतरराष्ट्रीय थीम आधारित टाउनशिप विकसित केली जाणार आहे. या भव्य प्रकल्पात 3500 कोटीच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. ही टाउनशिप आधुनिक शहरी सुविधांनी युक्त असेल आणि जेवरच्या आसपास विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्राला एक नवी जागतिक ओळख मिळवून देणार आहे. हा प्रकल्प 2027 पर्यत सुरू करण्याची योजना आहे.
लॉजिस्टिक्स अन् डाटा सेंटर हब
गुंतवणुकीचा दुसरा मोठा हिस्सा कानपूर-लखनौ महामार्गावर 50 एकरात उभारण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक्स पार्कवर खर्च होणार आहे. 650 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासह नोएडा येथे 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून डायपरस्केल डाटा सेंटर पार्क स्थापन केले जाणार असून याची क्षमता 40 मेगावॅट असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या समुहाला डाटा सेंटर सुविधांच्या शक्यतांना आणखी विस्तार देण्यासाठी लखनौ येण्याचे निमंत्रणही दिले आहे.
वित्तीय अन् हरित ऊर्जा क्षेत्र
दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगींनी डीबीएस बँकच्या सीईओ टॅन सू शान यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा अणि सेमीकंडक्टर निर्मिती यासारख्या भविष्याच्या क्षेत्रांमध्ये सहकार्यावर सकारात्मक चर्चा झाली. डीबीएस बँकेने उत्तरप्रदेशातील सहकारी बँकांच्या डिजिटलायजेशनमध्ये रुची दाखविली आहे.
Comments are closed.