चिखली आगाराच्या एस टी बसला अपघात, तेरा प्रवासी जखमी
एस. टी. महामंडळाच्या चिखली आगाराच्या बसला जालन्यातील जाफराबाद ते चिखली रोडवरील कोळेगाव पाटीच्या समोर एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आगाराची बस सकाळी जाफराबादहून चिखलीकडे जाताना हा अपघात झालेला आहे. या अपघातात बसचालकासह वाहक व तेरा प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात काही प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले असून,बसचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी जाफराबाद आगारातील टीम सदरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचली. अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात सदर बसमधील चालक संजय नाथुसिंग सोळंके,वाहक सुषमा खिल्लारे, प्रवासी धायाबाई राहुल हिवाळे, भिकाबाई लक्ष्मण शेळके, मंदा परसराम सोरमारे, सय्यद युनूस सय्यद इसा, विष्णू नामदेव साळवे, ताई अंबादास भोरे, यमुनाबाई बाबुराव शेळके, मंगला राजू मोरे, दिलीप शंकर फटाले,मानसिंग आनंदा परीहार यांच्यासह एकूण 13 प्रवाशी जखमी झालेले आहे.
Comments are closed.