एका शेतकऱ्याचा निर्णय गावासाठी वरदान, मिरचीनं संपूर्ण गाव केलं श्रीमंत, कोट्यावधींची उलाढाल
मिरचीचे उत्पादन: अलिकडच्या काळात शेती नवनवीन प्रयोग होत आहेत. या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पादन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका गावची यशोगाथा पाहणार आहोत, ज्या गावाला मिरचीनं श्रीमंत केलं आहे. 10 वर्षापूर्वी राजस्थानमधील एका गावातील एका शेतकऱ्याने मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय या गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. आज हे संपूर्ण गाव मिरचीच्या उत्पादनातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी
राजस्थानमधील भरतपूरमधील रुपवास शहराच्या बुराना या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात मिरचीच्या उत्पादनातून भरभराटी आणली आहे. मिरचीमुळं या गावातील अनेक शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबलं आहे. बुराना गावात पूर्वी गहू-मोहरीची शेती पारंपारिकपणे केली जात होती, त्यामुळे शेतकऱ्यांना नफा कमी आणि बचतही कमी होत असे. अशा परिस्थितीत गावातील शेतकरी कुटुंबे शेती सोडून मोलमजुरी करून उदरनिर्वाहासाठी शहरांकडे स्थलांतर जात होती. मात्र सुमारे 10 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने उचललेले पाऊल या गावासाठी वरदान ठरले आहे. आता संपूर्ण गावात हंगामात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मिरचीचे उत्पादन होते.
मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी
एका शेतकऱ्याने 10 वर्षांपूर्वी आपल्या गावात मिरचीची लागवड केली होती. त्याला या पिकातून चांगला नफा मिळाला. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांना कळताच त्यांनीही मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. आता गावातील 80 टक्क्यांहून अधिक शेतकरी मिरचीची लागवड करतात. जवळपास सर्वच मिरचीचे शेतकरी करोडपती आहेत. आज बुराना गावातील मिरचीला जयपूर, आग्रा आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये मोठी मागणी आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ
बुराना येथील शेतकरी लहान ईगल मिरचीची लागवड करतात. ही मिरची चवीला खूप तिखट असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वी शेतकरी गहू आणि मोहरीची लागवड करत असे, त्यातून फारसा नफा मिळत नसे. काही वर्षांपासून करत असलेल्या हिरव्या मिरचीच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठा नफा मिळत आहे. संपूर्ण हंगामात मिरची सुमारे 5 वेळा काढतात. या पिकासाठी 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात आवश्यक असते. सुमारे 50 दिवसांत मिरचीचे उत्पादन होते. .
अधिक पाहा..
Comments are closed.