चीनची तैवाननंतर फिलिपिन्स समुद्रात घुसखोरी

चीनने तैवानच्या समुद्रात घुसखोरी केल्यानंतर आता फिलिपिन्सच्या समुद्रातसुद्धा घुसखोरी केली आहे. या घुसखोरीनंतर फिलिपिन्सच्या कोस्ट गार्डवर हल्ला केला. यामुळे साऊथ चायना समुद्रात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घुसखोरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात चीनचे जहाज फिलिपिन्सच्या समुद्रात घुसखोरी करत आहे. चीनची दादागिरी इतकी वाढली की, त्यांनी घुसखोरीनंतर फिलिपिन्सच्या कोस्ट गार्डच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. चिनी जहाजाने फिलिपिन्सची बोट बुडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे.

Comments are closed.