चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रॅफिक जाम, 80 लाख गाड्या एकाच जागी अडकल्या

नुकतीच चीनमध्ये जगातील सर्वात मोठा वाहतूक ट्रफिक जाम होण्याची घटना घडली. 36 लेनचा महामार्ग असूनही तब्बल 80 लाख गाड्या एकाच ठिकाणी अडकून पडल्या होत्या. विशेष म्हणजे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. त्या एक इंचही पुढे सरकत नव्हत्या. त्यातील अनेक वाहने तर 24 तास जागची हलू शकली नाहीत.
याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावर हजारो गाडय़ांची एक लांबलचक रांग दिसत आहे. चीनमधील अन्हुई प्रांतातील वुझुआंग टोल नाक्यावर हा विक्रमी ट्रफिक जॅम झाला होता. या प्रचंड वाहतूक काsंडीमागचे मुख्य कारण म्हणजे चीनमध्ये साजरा होणारा ‘गोल्डन वीक’आहे. चीनमधील हा मोठा सण असतो. यावेळी सात दिवस लोकांना सुट्टी असते.
Comments are closed.