जगातील पहिल्या 10 जी ब्रॉडबँडचा दावा निघाला खोटा; चीनची पोलखोल, जपान आणि द. कोरिया पुढे

चीनने जगातील पहिला 10 जी ब्रॉडबँड नेटवर्प लाँच केलेला दावा चुकीचा आहे. कारण दक्षिण कोरिया, जपान आणि रोमानिया या देशांत ही अल्ट्रा हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिस आधीपासून उपलब्ध आहे. चीनचे इंटरनेट नेटवर्प वेगवान आहे यात शंका नाही. ते हिंदुस्थानच्या तुलनेत 100 पट जास्त वेगवान आहे हेसुद्धा खरे आहे, परंतु हे जगातील पहिले 10 जी नेटवर्प आहे हा दावा चुकीचा आहे. 10 जी ब्रॉडबँडमध्ये जी चा अर्थ गीगाबीट आहे. मोबाईल नेटवर्पमध्ये वापरले जाणाऱया जनरेशनच्या जीचा अर्थ वेगळा आहे. हे एक वायर्ड फायबर-ऑप्टिक इंटरनेट कनेक्शन आहे. जे 10 गीगाबीट प्रति सेकंदपर्यंत स्पीड देते. म्हणजेच 20 जीबीचा 4के चित्रपट केवळ 20 सेकंदांत डाऊनलोड करू शकता. याचा स्पीड जवळपास 9834 एमबीपीएसपर्यंत जातो, तर भारतातील सरासरी स्पीड सध्या 60 एमबीपीएसपर्यंत आहे. चीनने केवळ शियोंगान, शांघाय आणि ग्वांगडोंग या प्रमुख शहरांत ही सेवा सुरू केलीय.
हिंदुस्थान 87 व्या क्रमांकावर
हिंदुस्थान जगात इंटरनेटच्या बाबतीत 87 व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानात मार्च 2025 पर्यंत सरासरी फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड 58.62 एमबीपीएसपर्यंत आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांत इंटरनेट कंपन्या 1 जीबीपीएसपर्यंतच्या प्लानची जाहिरात करतात, परंतु खरा स्पीड केवळ 77 एमबीपीएसपर्यंत मिळतो. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. 10 जी ब्रॉडब्रँड केवळ वेगवान इंटरनेटसाठी मर्यादित राहिलेले नाही.
Comments are closed.