Photo – चीनमध्ये स्वप्नांची बर्फाळ दुनिया

चीनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वप्नांची बर्फाळ दुनिया बसवण्यात आली आहे. चीनमध्ये 41 वा ‘चीन हार्बिन आंतरराष्ट्रीय आईस आणि स्नो महोत्सव’ मोठ्या धुमधडाक्यात आईस अँड स्नो वर्ल्ड पार्कमध्ये सुरू झाला आहे.

रंगीबेरंगी बर्फाने बनवलेले ड्रगन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असते. या महोत्सवाला पर्यटक दरवर्षी मोठी गर्दी करतात. स्लाईड घेण्याचा आनंद घेतात.

हे या महोत्सवाचे 26 वे वर्ष आहे. हे जगातील सर्वात मोठे आईस फेस्टिव्हल आहे. बर्फाने बनवलेल्या कलाकृती पाहून स्वप्नात आल्यासारखे वाटते. जगभरातून येथे लोक येतात.

या ठिकाणी पोहोचल्यानंतर फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडालेली दिसते. हा फेस्टिव्हल फेब्रुवारीपर्यंत असतो.

Comments are closed.