चिपळूणमध्ये वशिष्टी नदीला पूर, बाजारपेठ पाण्याखाली; रस्ते वाहतूक सेवा ठप्प

चिपळूणमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे वशिष्टी नदीला पूर आला असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. पुराचे पाणी थेट चिपळूणच्या बाजारपेठेत आणि एसटी डेपोत शिरले आहे. ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे चिपळूण डेपोतून सर्व एसटी बस वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकाने बंद झाली असून, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वशिष्टी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही खोळंबली आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि नदीकाठच्या भागात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.