चिपळूणवर आता राहणार 118 सीसीटीव्हींची नजर

शहर व परिसरात घरफोड्यांसह चोरीच्या वाढलेल्या प्रकारांना आळा बसावा आणि चोरट्यांचा शोध लागावा, यासाठी नगरपालिकेने यापूर्वी 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार, येथील पोलीस यंत्रणेमार्फत शहरातील विविध भागांत आणखी 86 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत याबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. आता शहरावर 118 सीसीटीव्हींची नजर राहणार आहे.
चिपळूण शहर झपाट्याने विकसित होत आहे. मोठमोठ्या इमारती, बंगले, अपार्टमेंटचे जाळे विणले जात आहे. शिवाय तालुक्याची बाजारपेठही येथे आहे. गेल्या काही वर्षांत शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही भागांत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करून हे चोरटे कुठे गेले, याचा सुगावा पोलिसांनाही लागला नाही. त्याअनुषंगाने सीसी टीव्हीचा प्रस्ताव ठेवला आहे.
Comments are closed.