चिरग पसवान यांनी विश्वन सभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली
भाजप-जेडीयूच्या अडचणी वाढण्याची शक्यता
► वृत्तसंस्था/ पाटणा
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी रविवारी बिहारच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. छपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये आयोजित ‘नव संकल्प महासभे’ला संबोधित करताना लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी यासंबंधीचे वक्तव्य केले. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक बिहारी माणसासाठी आणि प्रत्येक बिहारी कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपला पक्ष बिहारमध्ये 243 विधानसभा जागा लढवेल, असे ते म्हणाले. तसेच विरोधक आपल्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचा भाग असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी केलेले हे विधान भाजप आणि जेडीयूच्या अडचणी वाढवू शकते.
Comments are closed.