Chitra Wagh criticizes Supriya Sule over the incident in Paud
(Chitra Wagh Vs Supriya Sule) मुंबई : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात एका समाजकंटकाने नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. ही घटना समोर आल्यावर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी 19वर्षीय चांद नौशाद शेख आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर, सोशल मीडियावरील पोस्टमध्ये आरोपीच्या नावाचा उल्लेख न केल्याबद्दल भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. (Chitra Wagh criticizes Supriya Sule over the incident in Paud)
मुळशी तालुक्यातील पौड गावात शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, चांद नौशाद शेख याने मंदिर परिसरात मूर्तीशी अभद्र व्यवहार करतानाच तिची विटंबनाही केली. याचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर शिवाजी वाघवले नावाच्या ग्रामस्थाने याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शादाब शेख (44) या दोघांना अटक केली.
पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे कदापि सहन करणे शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा…
— Supriya Sule (@supriya_sule) May 4, 2025
काय हो 12मतीचा मोठ्या ताई
एरवी तुम्ही प्रचंड संवेदनशील आहात असा आव आणता…अगदी रशीया युक्रेन युध्दावर तुम्ही तावातावाने मतं मांडता पण तुमच्या मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्विट टाकून गप्प आहात… ?
त्या…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 5, 2025
या घटनेसंदर्भात ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एनसीपी एसपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट शेअर केली आहे. पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे सहन करणे कदापि शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी. सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफी मिळता कामा नये, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तथापि, यात आरोपीच्या नावाचा उल्लेख नसल्याचे सांगत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावरच त्याला प्रत्युत्तर दिले आहे. एरवी प्रचंड संवेदनशील असल्याचा आव सुप्रिया सुळे आणतात. अगदी रशिया आणि युक्रेन युद्धावरही त्या तावातावाने मते मांडतात; पण आपल्याच मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्वीट टाकून त्या गप्प आहेत? त्या हरामखोराने नागेश्वर मंदिरात घुसून अन्नपूर्णा मातेबाबत केवळ अतिप्रसंग केला नाही, तर समस्त हिंदू महिलांना एक इशारा दिला आहे. पण तरीही त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे त्यांनी नावही घेतले नाही? तुष्टीकरणाचे राजकारण सुचते आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष-चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; राऊतांनी घेतली पवारांची भेट
Comments are closed.